मराठी सुविचार - ऐकावे जनाचे करावे मनाचे अर्थ - Messages365

Post Top Ad

Tuesday, December 10, 2019

मराठी सुविचार - ऐकावे जनाचे करावे मनाचे अर्थ

मराठी सुविचार:  

"ऐकावे जनाचे करावे मनाचे" 

पैसे असुन साधं राहीलं तर भिकारडा म्हणतात.......
            
पैसा ब-यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात......... 

सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात.......
  
कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात........

दानधर्म नाही केला तर कंजुष मारवाडी........

 भरपुर दानधर्म केला तर दोन नंबर पैसे असणार असं म्हणतात....... 

 बायकोचं ऐकलं तर बैल......

 नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात.......
       
तब्बेत चांगली तर फुकटंच खाऊन सुटलाय म्हणतात....... 

तब्बेत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात.......

सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही काम धंदा नाही असं म्हणतात.........
              
नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात...........

समाजा साठी काही केले तर या पाठिमागे काही स्वार्थ असणार...
          
काही नाही केले तर  हुशार आहे परंतु काही कामाचा नाही अस म्हणनार....

लोक सगळी अशीच असतात.......

 ते त्यांच काम करत असतात.आपण आपलं काम करायचं...... 

याचाच अर्थ  "ऐकावे जनाचे,करावे मनाचे........              

लोक पायी चालु देत नाहीत अन गाढवावर बसुही देत नाहीत.......

शेवटी आपलं आपणच ठरवायचं. जीवन कसं जगायचं..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

< >