मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी - Messages365

Post Top Ad

Monday, June 24, 2019

मराठीतील सर्व म्हणी - Marathi Mhani - प्रसिद्ध मराठी म्हणी

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ - Marathi Mhani 

  • असतील शिते तर जमतील भूते
एखाद्या व्यक्तीकडून लोभ होणार असेल तर स्वार्थी लोग की त्याच्याभोवती गोळा होतात 

*******
  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
पापी माणसाची दोस्ती केल्यास स्वताच्या जीवालाही धोका निर्माण होतो 

*******
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी
बुद्धीमान माणसालाही अडचणीच्या वेळी बिंडोक माणसाची विनवणी करावी लागते 

*******
  • अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज
कोणत्याही गरजू व्यक्तीला अक्कल नसते 

*******

  • अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

जी माणसे अति शहाणपणा करायला जातात त्यामुळीच त्यांचे ठरलेने काम सुद्धा होत नाही 

*******
  • अति तेथे माती
एखाद्या गोष्टीचा अतिरेक करने हे नाशकादे नेते 

*******
  • अंधारात केले, पण उजेडात आले
एखादी गोष्ट लपून केली परन्तु कही दिवसांनी ती लोकापुढे आली

*******
  • अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे
एखादयाची ठराविक गोस्टीसाठी मदत घ्याची आणि त्याच बरोबर अजुन भरपूर गोष्टींसाठी परत त्याच्यापुढे हात पसरायचे

*******
  • अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण
जीव जाणाऱ्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना खुप त्रासदायक असतात.

*******
  • अंगावरचे लेणे, जन्मभर देणे

सोने चांदी खरेदी करण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि जन्मभर फेडित बसायचे. 

*******
  • अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे
नुसतेच नाव मोठे पण काम लक्षण खोटे 

*******
  • अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था
अशक्यप्राय गोष्टींची परिकल्पना

*******
  • अती झाले अन आसू आले
कही गोष्टींचा अतिरेक झाला की त्या त्रासदायक वाटतात

*******
  • अतिपरिचयात अवज्ञा
खुप निकटता झाल्यास अपमान होऊ शकतो 

*******
  • अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे
काम एकाचे आणि त्रास दंड मात्र दुसऱ्याला

*******
  • अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास
एखादे अन्न खुप आवडते पण त्याच्यात चूका काढ़ने

*******
  • अपापाचा माल गपापा
चुकीच्या मार्गाने मिळवलेले संपति लगेच नष्ट होते

*******
  • अर्थी दान महापुण्य
एखाद्या गरजवंत माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. 

*******
  • आईची माया अन् पोर जाईल वाया
खुप प्रेम लाड केल्याने मुले बिघडतात

*******
  • आधी पोटोबा मग विठोबा
पाहिले पोट नंतर देव धर्म

*******
  • आपलेच दात आपलेच ओठ
आपल्या जवळच्या माणसाने चूक केल्यावर आपलीच गोची होते 

*******
  • आयत्या बिळावर नागोबा
एकाने केले काम मात्र लाभ घेतला दुसऱ्याने 

*******
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
मागितली एक गोष्ट पण मिळाले भरपूर 

*******
  • आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला
एखाद्या दोषाबद्दल दुसर्‍याला हसने पण तोच दोष आपल्या अंगी असणे

*******
  • आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.

******* 
  • आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं
काम करावे एकाने दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. 

*******
  • आंधळ्या बहिर्यांची गाठ
एक काम करण्यासाठी दोन असमर्थ माणसांची भेट होने

*******
  • अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ?
 स्वतःच चूक करून ती दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होने. 

*******
  • अडली गाय फटके खाय
अडचणीत सापडलेल्या माणसाला हैरान करने 

*******
  • आपला हात जगन्नाथ
आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति अवलंबून असते. 

*******
  • असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा
असेल तय दिवशी मजा करने नसेल तय दिवशी बोम्बलने 

*******
  • अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?
गोष्टींला ठराविक मर्यादा असतात.

*******
  • अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप

अतिशय उतावळेपणाची लक्षण. 

*******
  • अती खाणे मसणात जाणे
खुप खाणे नाशवंताचे लक्षण असते. 

*******
  • अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी
मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. 

*******
  • अवचित पडे, नि दंडवत घडे
स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे. 

*******
  • अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे
दोन विरुद्ध बाजु. 

*******
  • अंथरूण पाहून पाय पसरावे
आपली ऐपत पाहून वागावे जगावे. 

*******
  • अंगापेक्षा बोंगा मोठा
मूळ वस्तुपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. 

*******
  • आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे
आपले विचार हे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ट कसे ही वृत्ति अंगी असणे. 

*******
  • आपली पाठ आपणास दिसत नाही
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. 

*******
  • आजा मेला नातू झाला
 नुकसान झाल्यावेळी फायद्याची गोष्ट घडणे. 

*******
  • आत्याबाईला जर मिशा असत्या तर
कोणत्याही कामत विचारांची भर टाकने. 

*******
  • आपल्याच पोळीवर तूप ओढणे
स्वतःचाच स्वार्थ साधून घेणे. 

*******
  • आलिया भोगासी असावे सादर
नशिबात आले ते  स्वीकारणे. 

*******
  • आवळा देऊन कोहळा काढणे
स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. 

*******
  • आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही
अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही.

*******
  • आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन

दुसऱ्याचा तोटा करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. 

*******
  • आधीच तारे, त्यात गेले वारे
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. 

*******
  • आधीच मर्कट तशातही मद्य प्याला
आधीच करामती त्यात मद्य प्राशन केल्याने बिकट स्तिथि निर्माण होने. 

*******
  • अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा
मुख्य गोष्टीपेक्षा नको त्या गोष्टींचा खर्च जास्त असणे. 

*******
  • आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर
रोग एकीकडे, इलाज दूसरीकडे. 

*******
  • आयजीच्या जीवावर बायजी उदार
दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. 

*******
  • आग खाईल तो कोळसे ओकेल
जसे कृत्य तसे फळ 

*******
  • आठ पूरभय्ये नऊ चौबे
खूप बिंडोक लोकांपेक्षा कमी बुद्धिमान चालतील. 

*******
  • आधणातले रडतात व सुपातले हसतात
स्वता संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून खुप हसू येने. 

*******
  • इकडे आड तिकडे विहीर
दोन्ही बाजूंनी अडचणीची परस्थिती निर्माण होणे. 

*******
  • इच्छा परा ते येई घरा
दुसऱ्याच्या बाबतीत वाइट चिंतन करते आणि तेच आपल्या वाट्याला येणे. 

*******
  • इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. 

*******
  • इन मीन साडेतीन
कमीत कमी लोक हजर असणे. 

*******
  • ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो
प्रत्येक जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. 

*******
  • उथळ पाण्याला खळखळाट फार
अंगी गुण थोडासा पण बढाई खुप मारने. 

*******
  • उंदराला मांजर साक्ष
वाइट गोष्टीत एकमेकांची साथ देने

*******
  • उचलली जीभ लावली टाळ्याला

विचार न करता बोलणे 

*******
  • उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
लगबगीचे वर्तन करणे. 

*******
  • उठता लाथ बसता बुक्की
अनादर टाळण्यासाठी पुन्हापुन्हा दंड देने. 

*******
  • उडत्या पाखराची पिसे मोजणे
अगदी सहज अवघड गोष्टीनचे मूल्यांकन करणे. 

*******
  • उतावळी बावरी म्हातार्‍याची नवरी
अति उतावळेपणा त्रासदायक असतो. 

*******
  • उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी
जेथे उद्योग असतो तेथेच लक्ष्मी संपत्ती येते. 

*******
  • उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले
फायद्या घेण्याची वेळ येणे; पण आस्वाद न घेता येणे. 

*******
  • ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे
अतिशय बिकट परस्थिती. 

*******
  • उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी
मनुष्य आपल्या क्षमतेनुसार जगतो. 

*******
  • उकराल माती तर पिकतील मोती
शेतीत चांगली मशागत केल्यास चांगले पीक येते. 

*******
  • उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?
एखादे काम घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचारन करने. 

*******
  • उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती?
काम सोडून भलत्याच चौकशा करणे. 

*******
  • उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
गोष्टीची परीक्षा घेण्यासाठी वाट पाहणे. 

*******
  • उधारीची पोते, सव्वा हात रिते
उधारीचा माल नेहमीच कमी भरतो. 

*******
  • उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे
श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग चमचे ही येतातच. 

*******
  • उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे
ताठ मानेने येणे आणि मान खली घालून जाणे. 

*******
  • उसाच्या पोटी कापूस
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी लेकरू. 

*******
  • ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये 
चांगल्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये.

*******
  • एका माळेचे मणी

सर्व लोक सारख्याच स्वभावाची असणे. 

*******
  • एका हाताने टाळी वाजत नाही
कोणत्याही भांडणात दोष एकाचा नसतो

*******
  • एक ना धड भाराभर चिंध्या
एकाच वेळी अनेक कामे केल्याने सर्व कामे अर्धवट होतात. 

*******
  • एकावे जनाचे करावे मनाचे
जगाचे ऐकून घ्यावे पण मनाला जे योग्य वाटेल ते करावे. 

*******
  • एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी
एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपला स्वार्थ साधुन घेऊ नए. 

*******
  • एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये 
दुसऱ्याने केलेल्या वाइट गोष्टींचे समर्थन करून आपणही तीच गोष्ट करू नए

*******
  • एका पिसाने मोर होत नाही 
थोड्याश्या यशाने जास्त आंनदित हो नका

*******
  • एका खांबावर द्वारका
एकाच मानसावर सर्व जबाबदाऱ्या देने.

*******
  • एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला
एका व्यक्तीपासून अनेक जगी अपमान होणे. 

*******
  • एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य 

*******
  • एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत
दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत. 

*******
  • ऐंशी तेथे पंचाऐंशी
उधळेपणाची कामे. 

*******
  • ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |
मोठ्या व्यक्तीला तेवढ्याच यातना होतात जेवढ्या की सामान्य व्यक्तीला

*******

  • ओळखीचा चोर जीवे न सोडली

ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा घातक असतो. 

*******

  • शेंडी तुटो की तारंबी तुटो

कोणत्याही परिस्थितीत कामाचा शेवट करने. 

*******
  • ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?
काम सोडून नुसत्या चौकशा करणे. 

*******
  • औटघटकेचे राज्य
कमी काळ टिकणारी गोष्ट. 

*******
  • करावे तसे भरावे
कृती असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळते. 

*******
  • कर नाही त्याला डर कशाला ?
ज्याने काही केलेच नाहीं त्याला भीति कशाची? 

*******
  • करीन ते पूर्व
मी करेन तेच योग्य अशा विचाराने वागणे. 

*******
  • करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते
काही गोष्टी केल्या तरी तोटा होतो नाही केल्या तरी तोटा होतो. 

*******
  • करुन करुन भागला, देवध्यानी लागला
वाईट कृत्य करून शेवटी देवा धर्माला लागणे. 

*******
  • कणगीत दाणा तर भिल उताणा
आपल्या गरजेपुरते आपल्या जवळ असले, कि लोक कोणाची फिकिर करत नाहीत. 

*******
  • कधी तुपाशी तर कधी उपाशी
दररोज दिवस सारखा नसतो. 

*******
  • कशात-काय-अन-फाटक्यात-पाय
वाईटात अजुन वाईट घडणे 

*******
  • काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
रक्ताचे नाती बोलण्याने तुटत नाहीत. 

*******
  • काडीचोर तो माडीचोर
एखाद्या छोट्या अपराधाबरोबर मोठ्या अपराधानची जोड़ लावणे

*******
  • काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती
गोष्टींचा प्रभाव स्वतज़:पुरताच राहने 

*******

  • का ग बाई रोड तर म्हणे गावाची ओढ

गरज नसलेल्या गोष्टींची काळजी करणे. 

*******
  • कानात बुगडी, गावात फुगडी
आपल्या संपतीचे जोरा जोरा प्रदर्शन करने. 

*******
  • काल महिला आणि आज पितर झाला
अतिशय लगबगीचे लक्षण. 

*******
  • काकडीची चोरी फाशीची शिक्षा
गुन्हा खूप लहान पण शिक्षा खूप मोठी असणे. 

*******
  • काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही
जे काम पैसाने होत नाही, ते अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता असणे महत्त्वाचे ठरते. 

*******
  • कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
एकाच नजरेच्या दृष्टीने सर्व जगाला बघणे . 

*******
  • काना मागुन आली आणि तिखट झाली
एखाद्या गोष्टीत मागून येणे आणि श्रेष्ट होने . 

*******
  • कामापुरता मामा
एखादे काम घेईपर्यंत गोड बोलणे. 

*******
  • कावळा बसला आणि फांदी तुटली
योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे 

*******
  • काखेत कळसा गावाला वळसा
जवळची वास्तु शोधण्यासाठी दूर जाणे 

*******
  • काप गेले नी भोके राहिली
संपत्ति गेली अन फक्त आठवणी  उरल्या

*******
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.

******* 
  • काळ आला; पण वेळ आली नव्हती
मरण समोर उभे असताना थोडक्यात बचावणे. 

*******
  • कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात
एखादी गोष्टीचा चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे 

*******
  • कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा
आपल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.

*******
  • कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे

माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. 

*******
  • कुडी तशी फोडी
देहा प्रमाणे आहार, कर्तुत्वा प्रमाणे  मिळणे. 

*******
  • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
फ़क्त स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचा तोटा करणे.

*******
  • केळीला नारळी अन घर चंद्रमौळी

खुप दारिद्र्याची बिकट अवस्था येणे. 

*******
  • केस उपटल्याने का मढे हलके होते ?
मोठ्या उपायांची जेथे  गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीही फरक पडत नाही. 

*******
  • केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले

गोष्टीचा उपभोग घेताना मजा वाटते पण  पैसे देताना जीव घालमेल होतो. 

*******
  • कोळसा उगळावा तितका काळाच
वाईट गोष्टीबाबत जितकी जास्त चर्चा करावी तितकीच ती अधिक वाईट होते. 

*******
  • कोल्हा काकडीला राजी
लहान लहान गोष्टींनी खुश होतात. 

*******
  • कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी
गुन्हा एकाचा शिक्षा दुसऱ्याला 

*******
  • कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी
महान गोष्टींची तुलना शुल्लक गोष्टींबरोबर करणे. 

*******
  • खऱ्याला मरण नाही
खरे एकदिवस सर्वांच्या समोर येते.

*******
  • खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते
खर्च करणारा खर्च करत असतो मात्र दुसरयाच् एखादयाला कुरकुर लागते. 

*******
  • खाऊ जाणे तो पचवू जाणे
एखादे काम धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही तैयार असतो. 

*******
  • खान तशी माती
आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वागने असणे. 

*******
  • खायला काळ भुईला भार
काम न करणारा व्यक्ति सर्वांला भारदार वाटतो. 

*******
  • खाई त्याला खवखवे
जो वाईट कृत्य करतो त्याला मनात भीति असते. 

*******
  • खाऊन माजावे टाकून माजू नये
दान करावे पण संपत्तीचा गैरवापर करू नये. 

*******
  • खोट्याच्या कपाळी गोटा
खोटेपणा वाइट गोष्टींकडे परावर्तित करतो. 

*******
  • गरज सरो, वैद्य मरो
गरज असेपर्यंत त्या माणसाशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर त्याला विसरुन जाने. 

*******
  • गळ्यात पडले झुंड हसून केले गोड
गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागतात. 

*******
  • ग ची बाधा झाली
अभिमान गर्व चढणे 

*******
  • गरजेल तो पडेल काय
फ़क्त तोड़ाने बोलणाऱ्या माणसाकडून काही होत नाही. 

*******
  • गरजवंताला अक्कल नसते
गरजू वक्तिला दुसऱ्याचे बोलणे व वागणे हवे तसे न कही बोलता सहन करावे लागते. 

*******
  • गर्वाचे घर खाली

गर्विष्ठ माणसाची नेहमी शेवटी अपमानच होतो. 

*******
  • गळ्यातले तुटले ओटीत पडले
नुकसान होता होता वाचले. 

*******
  • गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता
मुर्खाला कितीही समज दिला तरी त्याचा काहीच उपयोग नसतो.

******* 
  • गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.

*******
  • गाढवाला गुळाची चव काय?
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. 

*******
  • गाढवाच्या पाठीवर गोणी
एखाद्या गोष्ट असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. 

*******
  • गाव करी ते राव न करी
श्रीमंत मानुस स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते अन्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. 

*******
  • गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ
बिंडोक माणसांच्या गोंधळात एकमेकांवर आरोप करण्यात वेळ जातो. 

*******
  • गाय व्याली, शिंगी झाली
आकस्मित घटना घडते. 

*******
  • जळे आणि हनुमान बेंबी चोळे
एखाद्याचे नुकसान करूँन आपन काहीच केले नहीं ऐसे दर्शवणे

*******
  • गोगलगाय न पोटात पाय
बाहेरून निर्मल दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती. 

*******
  • घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे
अडचणीत आणखी भर पड़ने

*******
  • घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात
बिकट परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. 

*******
  • घरोघरी मातीच्या चुली
प्रत्येकाची सारखीच परिस्थिती असणे.

******* 
  • घर ना दार देवळी बिर्हाड
स्वताच्या डोक्यावर जबाबदारी नसलेली व्यक्ती. 

*******
  • घडाई परिस मडाई जास्त
गरजेच्या गोष्टीपेक्षा त्या गोष्टींचा खर्च जास्त असणे. 

*******
  • घेता दिवाळी देता शिमगा
घटना आनंद वाटतो पण देताना मात्र ओरडाओरड. 

*******
  • घोडे कमावते आणि गाढव खाते
एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा. 

*******
  • चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ
गरजेच्या कामापेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. 

*******
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
प्रत्येकाला चांगले दिवस येतेच. 

*******
  • चार जणांची आई बाजेवर जीव जाई
जबाबदारी प्रत्येकाची असली तरी मात्र काळजी कोणीच घेत नाही.

******* 
  • चिंता परा येई घरा
दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि कधीतरी आपलीवरच उलटते. 

*******
  • चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला
स्वतःच्याच तोड़ने, कृत्याने, हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. 

*******
  • चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई
घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र भागुबाई. 

*******
  • चोर सोडून संन्याशालाच फाशी
खरा अपराधी सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. 

*******
  • चोराच्या उलट्या बोंबा
स्वतः अपराध करून दुसऱ्याला दोष देणे. 

*******
  • चोरावर मोर
एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला कमी लेखने. 

*******
  • चोरांच्या हातची लंगोटी
ज्याच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा नसते त्याच्याकडून काहीतरी मिळणे. 

*******
  • चोराची पावली चोराला ठाऊक
वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. 

*******
  • चोराच्या मनात चांदणे
वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते. 

*******
  • चालत्या गाडीला खीळ
सुरलीत चालणाऱ्या कमात अडचण निर्माण होणे. 

*******
  • जशी देणावळ तशी धुणावळ
कामाच्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. 

*******
  • जलात राहून माशाशी वैर करू नये
ज्यांच्या बरोबर रहावे जगावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. 

*******
  • जळतं घर भाड्याने कोण घेणार ?
नुकसान देणाऱ्या गोष्टीना कोण स्वीकरणार?

*******
  • जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही
बाहेरील दिखाव्यामुळे आतून मनुष्य ज्ञानी होत नाही. 

*******
  • जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे
दुसऱ्याच्या परस्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान समझते. 

*******
  • जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले
जिवंत असताना दुर्लक्ष करायचे व मेल्यावर गोड़ कौतुक करायचे. 

*******
  • जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी
खुप हट्टी वागणे. 

*******
  • जे न देखे रवि ते देखे कवी
जे स्वता सूर्य पाहू शकत नाहीत ते कोणताही कवी विचारानी पाहू शकतो. 

*******
  • जो गुळाने मरतो त्याला विष कशास?
जिथे गोड बोलून काम होत असेल तिथे कठोर उपायांची गरज नसते. 

*******
  • ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी
जी माणसे एका ठिकांची असतात त्यांनी एकमेकांची मापे कडु नए

*******
  • ज्याच्या हाती ससा, तो पारधी
ज्याच्याकड़े जे कर्तुत्व असते  गोष्ट दिली जाते  . 

*******
  • ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे
एखाद्याचे भले करायला जावे तर तो आपलेच म्हणणे चालवण्याचा प्रयत्न करतो. 

*******
  • ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी
आपल्यावर जो उपकार करतो त्याचे गुणगान गावे . 

*******

  • झाकली मूठ सव्वा लाखाची

वाइट नेहमी झाकून ठेवावे. 

*******
  • टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही
कष्ट सोसल्याशिवाय फल नाही. 

*******
  • ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला
वाईट दोष अंगी लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही लगेच बिघडतो. 

*******
  • ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा
वाईट संगतीचे परिणाम वाईटच होतात

*******

  • तळे राखील तो पाणी चाखील

एखादे काम सोपवल्यानंतर फायदा करून घेणे. 

*******
  • तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसे
विरुद्ध गोष्टी होने . 

*******
  • तट्टाला टूमणी, तेजीला इशारत
मूर्खाला शिक्षा देऊन जी गोष्ट समजत नहीं ती शहाण्याला इशाऱ्याने समजते. 

*******
  • ताकापुरते रामायण
आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत काम करणे. 

*******
  • तीन दगडात त्रिभुवन आठवते
संसार केल्यावरच खरे मर्म कळते. 

*******
  • तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही
नवरा आहे तर नवृ नाहीं आणि नवरी आहे तेर नवरा नाही

*******
  • तुकारामबुवांची मेख
न सुटणारी गोष्ट 

*******
  • तू दळ माझे आणि मी दळते गावच्या पाटलाचे
आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र गावचे काम करावे. 

*******
  • तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले
एकही गोष्ट पूर्ण न होणे. 

*******
  • तेरड्याचा रंग तीन दिवस
कोणत्याही नविन गोष्टीची नवलाई अगदी कमी वेळ टिकते. 

*******
  • तोंड दाबून बुक्क्यांचा मार
विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला प्रतिउत्तर देण्यास  करने. 

*******
  • तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे
खायला पुढे कामाला मागे

*******
  • थेंबे थेंबे तळे साचे
सुरुवातीला शुल्लक वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा साठा होतो. 

*******
  • थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान
मोठ्या माणसांचा आश्रय आधार घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. 

*******
  • दगडापेक्षा वीट मऊ
मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसान करते. 

*******
  • दस की लकडी एक्का बोजा
सर्वांच्या सहकार्याने मोठे काम अगदी सहजरित्या पूर्ण होते. 

*******
  • दहा गेले, पाच उरले
जीवन कमी उरणे. 

*******
  • दात कोरून पोट भरत नाही
मोठ्या व्यवहारात काटकसर करून चालत नाही. 

*******
  • दाम करी काम, बिवी करी सलाम
पैसे टाकले की कोणतेही काम सहजरीत्या होते. 

*******
  • दाखविलं सोनं हसे मुल तान्हं
पैशाचे लालच दाखविताच अवघड कामे ही लगेच होतात. 

*******
  • दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत
एक गोष्ट असली तरी तिच्या जोडीला पाहिजे ती गोष्ट नसणे. 

*******
  • दिल चंगा तो कथौटी में गंगा
आपले मन साफ असल्यास पवित्र गंगा ही पवन होते. 

*******
  • दिव्याखाली अंधार
मोठ्या माणसातही दोष असतात . 

*******
  • दिल्ली तो बहुत दूर है
भरपूर गोष्टी करने बाकी आहे कारन मंजिल खुप लांब आहे. 

*******
  • दिवस बुडाला मजूर उडाला
रोजाने काम करणारा स्वतःचं समजून कधीच काम करणार नाहीं  कामाची वेळ संपते तोच ते निघून जाणार. 

*******
  • दुरून डोंगर साजरे
कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते; परंतु जवळ आल्यावर तिचे खरे रूप समझते. 

*******
  • दुभत्या गाईच्या लाथा गोड
पुढे जाऊंन ज्याच्या पासून काही फायदा होणार आहे, त्याचा त्रासदेखील मनुष्य आज सहन करतो. 

*******
  • दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही
दुसऱ्याचा छोटासा दोष दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही. 

*******
  • दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते
एकदा अद्दल घडली, की मानुस  सावधगिरी बाळगतो. 

*******
  • देश तसा वेश
देशानुसार बदलणारे जीवन. 

*******
  • देव तारी त्याला कोण मारी ?
आपल्यावर देवाची कृपा असल्यास कोणीही आपले वाईट करू शकत नाही. 

*******
  • देखल्या देवा दंडवत
सहज दिसला म्हणून विचारणा करणे. 

*******
  • देणे कुसळांचे घेणे मुसळाचे
पैसे कमी आणि काम जास्त. 

*******
  • दैव देते आणि कर्म नेते
नशिबात असते पण स्वतःच्या कामामुळे तोटा होतो. 

*******
  • दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी
जर नशिबात नसेलच तर तोंडासमोरिल घास सुद्धा दूर जातो. 

*******
  • दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला
नशिबात उसने पण पदरात पैन पाडून  न घेता येणे

*******
  • दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई
आपल्या नशिबावर अवलंबून असणारे नेहमी उपाशी राहतात तर उद्योगी लोग पोटभर खातात.

******* 
  • दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी
दोन्ही बाजूवर अवलंबून असणारे लोग उपाशी मरतात. 

*******
  • दृष्टीआड सृष्टी
आपल्या पाठीवर जे बोलतात त्याकडे दुर्लक्ष करावे. 

*******
  • धर्म करता कर्म उभे राहते
एखादी चांगली गोष्ट करताना त्याबरोबर एखादी वाइट गोस्त होते . 

*******
  • धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी
हे लक्षण कोणत्याच कामचे नाहीं . 

*******
  • धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा
छोट्या गोष्टीची काळजी घेत असताना मोठी कडे दुर्लक्ष करणे. 

*******
  • धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या
श्रीमंताचे काम लगेच होते तेर गरीबाला खेतरे घालयला लागतात

*******
  • नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने
काम करणाऱ्यांच्या मार्गात अनेक अडचणी येणे

*******
  • नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये
नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ कधीच पाहू नये कारण दोघातही दोष असतोच. 

*******

  • न कर्त्याचा वार शनिवार

एखादे काम करायचे नसले की कारण देऊन टाळने

*******
  • नव्याचे नऊ दिवस
कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ असतो कालांतराने तो नाहीसा होतो. 

*******
  • नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
केलेल्या उपदेशाचा मनावर शून्य परिणाम होणे. 

*******
  • नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे
एकाचे हड़पूण दुसऱ्याला दान देणे 

*******
  • नाकापेक्षा मोती जड
मालकापेक्षा नोकर बाजीराव असणे 

*******
  • नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
नुसतेच नाव मोठे पण लक्षण खोटे. 

*******
  • नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे
देवाच्या नावाने स्वताचा स्वार्थ पाहणे. 

*******
  • नाक दाबले, की तोंड उघडते
एखाद्या मांसाकडून एखादी गोष्ट काडून घेण्यासाठी त्या माणसाचे मर्म जाणून त्यावर घाव टाकणे

*******
  • नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला
अगोदरच दरिद्री असणाऱ्या मानसाकडे मदतीला जाणे. 

*******
  • नागिन पोसली आणि पोसणाराला डसली
आपन जिनला संभालले त्यांनीच आपला विश्वासघात केला

*******
  • नाचता येईना अंगण वाकडे
एखादे काम आपल्याला व्यवस्थित जमत नसेल तेव्हा आपण आपला कमीपणा लपविण्यासाठी इतर गोष्टीत चूका काढतो 

*******

  • नावडतीचे मीठ आळणी

एखाद्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते कारन आपन त्याचा द्वेष करतो

*******
  • निंदकाचे घर असावे शेजारी
आपल्या शेजारी निंदा करणारा माणूस असावा  त्यामुळे आपले दोष आपल्याला समझतात 

*******
  • नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन
स्वताचा हट्ट पूर्ण करने 

*******
  • पळसाला पाने तीनच
सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे 

*******
  • पडलेले शेण माती घेऊन उठते
चांगल्या माणसावर एकदा काहीतरी आरोप झाला आणि त्याने किती जरी प्रयत्न केले तरी त्याच्या जीवनावर थोडा का होईना डाग हा रहतोच

*******
  • पदरी पडले पवित्र झाले
आहे त्या गोष्टीत समाधान मानने

*******
  • पायाची वाहन पायीच बरी
ज्या त्या माणसाला त्याच्या जागेनुसार वागणूक दिली पाहिजे

*******
  • पाचामुखी परमेश्वर
जास्त लोक जे बोलतील टेक योग्य मानावे

*******
  • पाप आढ्यावर बोंबलते
पाप समोर आल्याशिवाय राहत नाही 

*******
  • पाची बोटे सारखी नसतात
सर्व माणसे एकसारखी नसतात 

*******
  • पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम
मोठी शांत असताना छोट्यांचा आवाज वाढणे

*******
  • पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
अनुभवाशिवाय अक्कल येत नाही 

*******
  • पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली
घरात पाहुणे म्हणून आले आणि नुकसान करून गेले

*******
  • पी हळद नि हो गोरी
कोणत्याही गोष्टीत गड़बड़ करणे 

*******
  • पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली
खरच फायदा होईल म्हणून जाणे परंतु परत नुकसान करूनच येणे

*******
  • पुढच्याच ठेच मागचा शहाणा
समोरच्या माणसाच्या अनुभवावरून इतर लोक बोध घेत असतात आणि टी चूक परत सावधपणे वागतात 

*******
  • पुढे तिखट मागे पोचट
समोरून पहिले तर फार मोठे वाटते पण प्रत्यक्षात जवळून बघितले की तसे नसते 

*******
  • पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा
पैसा कमी मिलने पण काम जास्त करने 

*******
  • पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी
शेजारी पडलेली वस्तु शोधण्यासाठी गावभर फिरणे 

*******
  • पोर होईल ना व सवत साहिना
आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही 

*******
  • फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय
एका राजाने दिलेला निर्णय जरी अमान्य असेल तरी तो मानवा लागतो

*******  
  • फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे
आयुष्यात जेथे सुख अनुभवले तेथेच वाईट दिवस पाहण्याचे नशिबीत आले  

*******
  • फुल ना फुलाची पाकळी
खुप काही  देण्याचे सामर्थ्य नसल्याने त्यातील थोडासा भाग देने

*******
  • फुटका डोळा काजळाने साजरा करावा
अंगावरचा दोष मिटत नसतो तो झाकण्याचा प्रयत्न करावा  

*******
  • बडा घर पोकळ वासा
दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव 

*******
  • बळी तो कान पिळी
ताकतवर मनुष्य इतर लोकावर सत्ता गाजवितो 

*******
  • बकरीचे शेपूट माशाही मारीना व लाजही राखीना
अशी गोष्ट ज्याचा फायदा नाही 

*******
  • बाप से बेटा सवाई
बापापेक्षा मुलगा अधिक कर्तुत्ववान 

*******
  • बाप तसा बेटा
वडिलांच्या अंगचे गुण पोरात उतरणे 

*******
  • बावळी मुद्रा देवळी निद्रा
दिसण्यास अडानी पण व्यवहार हुशार  

*******
  • दारात तुरी भट भटणीला मारी
जुन्या गोष्टीवरुन भांडण करणे 

*******
  • बारक्या फणसाला म्हैस राखण
आपल्याला ज्याच्या पासून भीति धोका आहे त्याच्याकडे आपल्या संरक्षणाची जबाबदारी देणे 

*******
  • बुडत्याला काडीचा आधार
संकट काळी कुणाकडून सुद्धा मिळालेली मदत मोठी ठरते 

*******
  • बैल गेला आणि झोपा केला
एखादी गोष्ट घडून गेल्यावर तिचे उपाय योजना करण्यासाठी केलेली प्रयत्न निष्फल ठरतात 

*******
  • बोलेल तो करेल
नुसती बडबड करुण काही साध्य होत नाही 

*******
  • बोडकी आली व केस कर झाली
विधवा स्त्री आली अन लग्न लावून गेली 

*******
  • भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी
व्यक्तीला आश्रय दिला तर तो समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो 

*******
  • भरवशाच्या म्हशीला टोणगा
ज्या व्यक्तीवर विश्वास आहे अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे 

*******
  • भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री
काही कारण  नसताना लोक भीत असतात  

*******
  • भिंतीला कान असतात
लपवलेली गोष्ट समोर आल्याशिवाय राहात नाही 

*******
  • भीड भिकेची बहीण
भीती बाळगून आपण एखाद्याला नहीं बोललो तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येऊ शकते  

*******
  • भीक नको पण कुत्रा आवर
मनात नसले तर मदत करू नये परंतु कामात अडथळा आणू नये

*******
  • भागीचे घोडे की किवणाने मेले
भागीदारीतील धंद्यात फायदा गिला सगळे येतात पण जबाबदारी घ्याला कोण येत नाही 

******* 
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
चांगले पणाचा जास्त गैरफायदा घेऊ नये 

*******
  • मनात मांडे पदरात धोंडे
मोठी स्वप्ने बघायचि परंतु पदरात काहीच नाही

*******
  • मनी वसे ते स्वप्नी दिसे
ज्या गोष्टीं सतत आपल्या मनात फिरत असतात तीच गोष्ट स्वप्नात दिसतात  

*******
  • नाही पण जण्याची तरी असावी
एखादी वाईट गोष्ट करताना मनाला काय वाटले याचा विचार नाहीं  केला तरी तरी जगाला काय वाटेल याचा विचार नेहमी करावा 

*******
  • मन जाणे पाप आपण
पाप दुसऱ्याला सांगितले नाही तरी ते आपल्या मनाला माहीतच असते 

*******
  • मन राजा मन प्रजा
आदेश देणारे पण आपले मन आणि त्याचे पालन करणारे ही आपलेच मन 

*******
  • माणकीस बोललं, झुणकीस लागलं
बोलणे एकाला अन् दुसऱ्या लागणे 

*******
  • मामुजी मेला अन् गांव गोळा झाला
लहान गोष्ट पण गावभर कालवा 

*******
  • मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही
आई वडिलांचे टोचून बोलणे लेकराला लागत नाही  

*******
  • मानेवर गळू आणि पायाला जळू
रोग एकीकडे उपाय भलतीकडे 

*******
  • मारुतीची शेपूट
सतत वाढत जाणारे काम 

*******
  • मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू
छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे 

*******
  • मुंगीला मुताचा पूर
काही लोकाला छोटे संकट ही डोंगराएवढी वाटते 

*******
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
लहान वयातच मुलाच्या भावी गुणदोषांचे दर्शन होते 

*******

  • मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते
भांडण दोघांचे अन् लाभ तिसऱ्याला 

*******
  • म्हशीला मणभर दूध
 एखाद्याचे मेल्यावर कौतुक करणे 

*******
  • म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही
ज्या गोष्टी होने अटल असतात त्या कोणाच्या थांबवल्याने थांबत नाहीत 

*******
  • यथा राजा तथा प्रजा
सामान्य लोक नेहमी मोठ्यांचे नक्कल करतात 

*******
  • या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे
गंडवागंडवी करणे

*******
  • रे माझ्या मागल्या
एखाद्याने कितीही चांगला सल्ला देऊन ही पूर्वीप्रमाणेच वागणे 

*******
  • ये रे कुत्र्या खा माझा पाय
स्वता आपणहून संकट अंगावर घेणे 

*******
  • रंग जाणे रंगारी
ज्याची विद्या त्यालाच माहीत 

*******
  • रात्र थोडी सोंगे फार
कामे खुप पण थोडा वेळ असणे 

*******

  • रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार
इच्छा नसताना एखादे काम करावे लागने 

*******
  • रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत
एखाद्या कतेथ गरजेच्या गोष्टींचा अभाव 

*******
  • राईचा पर्वत करणे
मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे 

*******
  • राज्याचे घोडे आणि खासदार उडे
वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची 

*******
  • रोज मरे त्याला कोण रडे
तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही

******* 
  • लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस
काम सोडून नको ते उपद्याप करणे 

*******
  • लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही
दम दिल्याशिवाय शिस्त लागत नाही 

*******
  • लग्नाला गेली आणि बारशाला आली
खुप वेळाने पोहोचणे 

*******
  • लंकेत सोन्याच्या विटा 
दुसऱ्या ठिकाणी असलेल्या गोष्टींचा फायदा  आपल्याला नसतो 

*******

  • लाज नाही मला कोणी काही म्हणा
जो मानुस निर्लज्ज असतो तो दुसऱ्याने केलेल्या टीकेची पर्वा करत नाही 

*******

  • लेकी बोले सुने लागे
एकाला उद्देशून बोलने पण ते दुसऱ्याला लागेल असे बोलणे 

*******
  • लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण
लोकांना सल्ले द्याचे पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही 

*******
  • वळणाचे पाणी वळणावर जाणे
आयुष्यात ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार 

*******

  • वरातीमागून घोडे
वेळ काळ निघून गेल्यावर काम करणे 

*******
  • वारा पाहून पाठ फिरविणे
परिस्थिती पाहून काम करणे 

*******
  • वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे
चालू काममधे आपला फायदा करून घेणे 

*******
  • वासरात लंगडी गाय शहाणी
मूर्ख माणसा थोडेसे ज्ञान असणारा व्यक्ति ही श्रेष्ठ असतो 

*******
  • वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच
आपण वाइट व्यक्तीला चांगले म्हणा की वाइट तो त्रास देणारच 

*******
  • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
जगण्यात जेवढ्या वस्तु पुरेश्या आहेत तेवढ्याच घेऊन फिरणे 

*******
  • विशी विद्या तिशी धन
आयुष्यात वेळेत कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो 

*******
  • विचाराची तूट तेथे भाषणाला उत
बिंडोकानच्या गर्दीत नुसती बडबड असते 

*******
  • विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी
आपल्याच माणसाने विश्वासघात करणे 

*******
  • शहाण्याला शब्दाचा मार
शहाण्या शब्दांनी समजवले तरी त्याला समझते

*******
  • शितावरून भाताची परीक्षा
वस्तूच्या लहान भागावरून त्या पूर्ण वस्तुचे मुल्यांकन करणे

*******
  • शेरास सव्वाशेर
एकाला दुसरा वरचढ भेटणे 

*******
  • शेजी देईल काय आणि मन धायेल काय?
शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही 

*******
  • शेजीबाईची कढी, धावधाव वाढी
एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे 

*******
  • शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
चांगल्याच्या बरोबर चांगल्या गोष्टी येतात 

*******
  • सगळेच मुसळ केरात
केलेले सर्व परिश्रम वाया जाणे 

*******
  • सरड्याची धाव कुंपणापर्यंतच
प्रत्येकाच्या कामाची सिमा ठरलेली असते

*******
  • समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मान
मोठ्या व्यक्तिच्या घरच्या नोकरालहि मान द्यावा लागतो 

*******
  • संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात
मुळापासून गोष्टीची सुरुवात करणे 

*******
  • संग तसा रंग
संगत असेल तसे वर्तन होते

*******
  • सारा गांव मामाचा एक नाही कामाचा
जवळ भरपूर व्यक्ती आहेत पण कोणीच उपयोगी नाहीं

*******
  • साप साप म्हणून भुई धोपटणे
संकट नसताना त्याचा आभास करने

*******
  • सात हात लाकुड नऊ हात ढलपी
एखादी गोष्ट खूप मोठी करूँन फुगवून सांगणे 

*******
  • सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी
अशक्य गोष्ट साकरने

*******
  • सुरुवातीलाच माशी शिंकली
सुरवातीलाच अपशकून 

*******
  • सुंभ जळाला तरी पीळ जात नाही
संपत्ति गेली तरी अकड़ जात नाही 

*******
  • स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे
वरवरच्या दिखाव्याने पुण्य प्राप्त होत नाही 

*******
  • हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते
वाइट गोष्टी लवकर येतात पण कमी होताना जातात

*******
  • हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा
बनावट रडने,अश्रू ढाळणे 

*******
  • हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा
मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे 

*******
  • हत्ती गेला पण शेपूट राहिले
कामाच्या मोठा भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिले

*******
  • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
स्वताच दुसऱ्याची वस्तू तिसर्‍याला नेऊन देणे

*******
  • हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते
ज्या गोष्टी केरनीसाठी मोठे धदवतात ते थे लहान लोग उडया मारतात

*******
  • हात ओला तर मित्र भला
तुमच्या पासून काहीतरी मिळणार असेल तर लोक तुमचीशी गोड़ वागतात

*******
  • हात फिरे तिथे लक्ष्मी वसे
प्रयन्तशील माणसाच्या घरी लक्ष्मी आणि संपत्ती नांदते 

*******
  • हातच्या काकणाला आरसा कशाला
स्पष्ट झालेल्या गोष्टीला पुरावा नको 

*******
  • हाजिर तो वजीर
जो ऐन वेळेला उपस्तिथअसतो त्याचाच फायदा होतो 

*******
  • हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे
आपल्याला मिलते ते सोडून नको त्या गोष्टींसाठी प्रयत्न करने

*******
  • हिरा तो हिरा गार तो गार
गुणी माणसाचे गुण कधीच लपत नाही

*******
  • हिऱ्या पोटी गारगोटी
चांगल्या मनुष्याचा लेकरू नाठाळ 

*******
  • होळी जळाली आणि थंडी पळाली
होळी सनानंतर थंडी कमी होते 

*******
  • श्रीच्या मागोमाग ग येतो
ऐश्वर्य, संपत्तीबरोबर नेहमी गर्व येतो


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

< >